जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दिनेश लक्ष्मण चौधरी (वय ३५, रा. श्रीकृष्ण नगर सुप्रीम कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. संशयिताला ताब्यात घेत १ हजार ३०० रुपयांचा मांजा जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारा दिनेश चौधरी हा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका मिळाली. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, अक्रम शेख यांनी सुप्रीम कॉलनी परिसरात जाऊन चौधरी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ हजार ३०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. चौधरी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे.