
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्ये गुजरात ,केंद्रीय माळी समाज सुधार , यांच्या प्रयत्नाने ता. २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालयात ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माळी समाज बांधव व महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघतर्फे करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दयावे. तसेच जातीनिहाय जनगणना व्हावी आदी मागण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष भरत बबनराव माळी तळोदा, शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट सुभाष राऊत बीड, माजी आमदार शिरीष दादा चौधरी, जि प सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिकराम मालकर, सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ए के गंभीर,सेवानिवृत्ती तहसीलदार सुदाम महाजन , परिषदेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अनिल नाळे, केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे बाबुराव घोंगडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरातचे अध्यक्ष प्रा.ए.के. गंभीर ,केंद्रीय माळी समाज सुधार मंडळाचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, आदींनी केले आहे.