जळगाव मिरर / २२ जानेवारी २०२३
राज्यात अभिनेत्री उर्फी जावेद व महिला नेत्या चित्रा वाघ यांचा सामना संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. पण गेल्या तीन ते चार दिवसापासून या प्रकरण शांत झाले असले तरी उर्फी जावेद मात्र कायम चर्चेत आहे. आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेल्या उर्फी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
उर्फीच्या नावासोबतच तिची फॅशनही जोडली आहे. त्यामुळे तिने काही व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट केला तर त्यात काहीतरी अतरंगी फॅशन असतेच. तिचे बरेच फोटो व्हायरल होत असतात.
Bachpan pic.twitter.com/QZg2lMo1dG
— Uorfi (@uorfi_) January 22, 2023
नुकतचं तिने तिचा एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. तो फोटो पाहिल्यानंतर ती उर्फीचं आहे का यावर तुमचा विश्वास बसणार नाही . तिने तिच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केलाय. ज्याला तिने कॅप्शनही ‘बचपण’ असं दिलयं. या फोटोत तिने अंगावर चादर गुंडाळली आहे. डोळ्यात काजळ लावले आहे. या फोटोत तिने पोझही दिली आहे. या फोटोत ती खुपच क्यूट दिसत आहे. तिचा हो फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. उर्फीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी आश्चर्यही व्यक्त केलयं आणि कमेंटही केल्या आहेत. शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यांनी लिहिलयं, ‘तुला लहानपणापासूनचं फॅशनचा चांगला सेन्स आहे’. तर दुसऱ्यांने लिहिलयं, ‘लहानपणापासूनच घराचे पडदे गुंडाळायची सवय आहे’. तर दुसऱ्याने, ‘तू आतापेक्षा लहानपणी जास्त कापडे घालायची.’ तर काहींना पुन्हा चित्रा वाघ आठवल्या आहेत.