अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शांततेत श्री गणेश विसर्जन मिरवणुका काढून वेळेच्या आत विसर्जन करा आणि श्री सन्मानाचे मानकरी व्हा,या आवाहनास अमळनेर येथील गणेश मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने बरेचसे मंडळ श्री सन्मानाचे मानकरी ठरले,सदर मंडळांना अनंत चतुर्दर्शीच्या दिवशी दगडी दरवाजा जवळ उभारलेल्या भव्य मंचावर श्री सन्मानाची ट्रॉफी व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यानिमित्ताने अमळनेरची मंडळाचे स्वागत करण्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू झाल्याने आणि विसर्जन मिरवणूक शांततेत आटोपल्याने या उपक्रमाचे प्रशासनासह साऱ्यांनी कौतुक केले.अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,मुंदडा फाऊंडेशन,अमळनेर,महसूल विभाग अमळनेर, पोलीस स्टेशन अमळनेर व नगरपरिषद अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमनाने हा श्री सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.अमळनेर शहरातील जवळपास साऱ्याच गणेश मंडळाच्या मिरवणूक शेवटी दगडी दरवाजा जवळ येत असल्याने सत्कारासाठी येथेच भव्य मंच उभारण्यात आला होता.
यावेळी मंचावर माजी आमदार डॉ बी एस पाटील,माजी जि प सदस्य सौ जयश्री अनिल पाटील,मुंदडा फाऊंडेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा,जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ तिलोत्तमा पाटील,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील,महेंद्र बोरसे तसेच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा,अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे,डीवायएसपी सुनिल नंदवाळकर,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,प्रशासन अधिकारी संजय चौधरी यासह पत्रकार बांधव उपस्थित होते,सदर मंचावर खा शि मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक,संचालक प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल,माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,ऍड शकील काझी,उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन,अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन,लक्षण महाजन,माजी नगरसेवक श्याम पाटील,सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी,मुरली बितराई, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी,महेंद्र बोरसे,सुरेश पाटील यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली, सायंकाळी 7 वाजेपासून सदर ठिकाणी विसर्जन मिरवणुका येण्यास सुरुवात झाली,शांततेत मिरवणूक असणाऱ्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंचावर बोलावून ट्रॉफी व नारळ देऊन सन्मानित करण्यात येत होते,तर पोलीस,महसूल,पालिका आदी विभागातील अधिकांरीना देखील आदर्श अधिकारी म्हणून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले,तर बंदोबस्त साठी असलेल्या पोलीस बांधवाची भोजनाची व्यवस्था करणारे विवेक संकलेचा आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र महाजन यांना विशेष सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त मुस्लिम बांधवानी गणेश विसर्जन निमित्त ईद चा जुलूस दुसऱ्या दिवशी काढण्याचा स्तुत्य निर्णय घेतल्याने मुस्लिम संस्थामधील बांधवांचाही प्रतिनिधीक स्वरूपात जातीय सलोखा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.अखेरच्या क्षणी दोन मंडळांनी वेळेत विसर्जन न केल्याने या सन्मानापासून त्यांना मात्र वगळण्यात आले.तर नवव्या आणि सातव्या दिवशी आदर्श मिरवणूक काढणाऱ्या मंडळाना देखील यावेळी बोलावून सन्मानित करण्यात आले.
सदर मंचावर ध्वनीक्षेपक असल्याने मंडळांना विविध सूचना व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास मोठी मदत झाली.गणेश विसर्जन शांततेत होण्यासाठी अतिशय उत्तम उपक्रम राबविल्याने अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार संघटना,मुंदडा फाऊंडेशन आणि पालिका,महसूल, पदाधिकाऱ्यांचे आभार मानुन विशेष सत्कार केला.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंदडा फाऊंडेशन चे अमेय मुंदडा,पंकज मुंदडा, शुभम मुंदडा,पप्पू लोंढे तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील,पांडुरंग पाटील,संजय पाटील,किरण पाटील,महेंद्र रामोशे,आर जे पाटील,अमोल पाटील,संभाजी देवरे,बाबूलाल पाटील,श्यामकांत पाटील,,मुन्ना शेख,आबीद शेख,गणेश पाटील,युवराज पाटील,समाधान मैराळे,सुरेश कांबळे,विकी जाधव,दिनेश पालवे,उमाकांत ठाकूर,अनिल पाटील, काशिनाथ चौधरी, सदानंद पाटील, मिलिंद पाटील,फोटोग्राफर महेंद्र पाटील,विजय पाटील,यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.