जळगाव मिरर | २० जून २०२५
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची अनाथांचे नाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिवसेनेचा वर्धापन दिन राज्यभरात साजरा होत असतांना दि.१९ रोजी जळगाव शहरात देखील अनेक सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी शिवसेना शिंदे गटात सदस्य अभियानात मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी केली.
या प्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, युवासेना महानगर उपाध्यक्ष सनी सोनार, सागर पाटील प्रमोद पाटील वेदांत पाटील,, अमर राजपूत,राहुल पाटील,पंकज सोनवणे,नयन चव्हाण,दीपक सोनवणे,धीरज सोनार,दुर्गेश महाजन,निलेश कोळी,रोहित पवार,शिवम कस्तुरे,प्रथमेश पाटील,यश वानखेडे,कल्पेश सोनार,निखिल दहितडक,शुभम शिंदे,विशाल कोळी,मोहित राजपूत,चेतन चौधरी,संदीप पाटील,कल्पेश सोनार,सिद्धेश पाटील,बंटी बनसोडे,बंटी पाटील,धीरज पाटील. आदी शिवसैनिक उपस्थित होते.
युवा सेनेतर्फे एकाच दिवशी दोन कार्यक्रम !
युवा सेनेतर्फे शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील तरुण-तरुणींसाठी सभासद नोंदणी ठेवण्यात आली होती. यावेळी शेकडो सभासद अर्जाची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे. तर प्रभाग क्र.१ राधाकृष्ण नगर परिसरात देखील सभासद नोंदणी करण्यात आली असून याठिकाणी शेकडो महिलांनी सभासद नोदणीचा लाभ घेतला होता.
