जळगाव मिरर / १० जानेवारी २०२३
राज्यातील तरुणांना रेल्वे विभागात काम करण्याची संधी असलेली बातमी समोर आली आहे. दहावी – बारावी उत्तीर्ण असलेल्या विध्यार्थाना हि संधी आहे. दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
मॅट्रिक्युलेशन (मॅट्रिक्युलेट किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये १० वी) एकूण किमान ५०% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT/SCVT (ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे) द्वारे प्रदान केलेले ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र.
रिक्त जागांचा तपशील
एकूण – ७९१४ पदे
SCR Apprentice – ४१०३
SER Apprentice – २०२६
NWR Apprentice – १७८५
वयोमर्यादा
उमेदवाराचे कमाल वय २४ वर्षांच्या आत असावे.
निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
पगार
वेतनश्रेणी नियमांनुसार असेल.
अर्ज कसा करायचा ?
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक –
१. http://34.93.184.238/instructions.php
२. https://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex
३. https://rrcjaipur.in/
अर्ज शुल्क
Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 0/-
