
जळगाव : प्रतिनिधी
शहराचे पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर पंपींग स्टेशन येथे विज पुरवठा करणारी ३३ केव्ही उच्चदाब विज वाहीनीवरील विद्युत पुरवठा दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.१५ वाजेपासून खंडीत झालेला आहे. सदरचे विद्युत पुरवठा दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडून युध्द् पातळीवर करण्यांत येत आहे. परिणामी वाघुर पंपींग स्टेशन येथील विज पुरवठा अभावी बंद आहे. तरी जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असुन दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजीचा उर्वरीत भागाचा पाणी पुरवठा दि.२९ रोजी होणार आहे. तसेच दि. २९ व ३० रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.३० सप्टेंबर व ९ ऑक्टोबर रोजी करण्यात येईल. याची शहरातील नागरीकांनी नोंद घ्यावी. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन जळगांव शहर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी केले आहे.





















