जळगाव मिरर / २३ जानेवारी २०२३
राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी नव्हे तर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. त्यामुळे राज्यात महिला, युवती सुरक्षित आहेत का? असा प्रश्न देखील आता उपस्थित होवू लागला आहे. अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुरडीवर एका 35 वर्षाच्या नराधमाने अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईतील वरळी येथे घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या आईने 20 महिन्याच्या मुलीला घरी सोडून बाहेर गेल्याची संधी साधत याच परिसरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय नराधमाने त्या मुलीला आपल्यासोबत घरी घेवून गेला त्याठिकाणी मुलीवर अत्याचार करुन पुन्हा मुलीला तिच्या घराबाहेर सोडून गेला काही वेळाने आई घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, तिला आईला सांगताही येत नव्हतं. आईलाही काही कळत नव्हतं. काही काळानं आईला काहीतरी अनुचित प्रकार घडत असल्याचा संशय आला. मुलीची आई तात्काळ मुलीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्यावेळी चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. मुलीच्या आईनं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि सदर आरोपीला अटक करण्यात आली.