जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
राज्यात सध्या अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ होत असतांना जळगाव जिल्ह्यात देखील एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 11 आणि 13 वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान संशयिताने 2 वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावमध्ये मध्य प्रदेशातील कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबात 11 वर्षीय व 13 वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी वास्तव्याला आहे. या परिसरात राहणारा संशयित आरोपी विनोद बारेला हा देखील राहतो. 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी दिली.
पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.