जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
अल्पवयीन मुलासोबत मैत्री करुन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचा कथित व्हीडीओ तयार करून तो व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलाकडे खंडणी मागितली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने तीन संशयित आरोपींना अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्यास असून तो कॉमर्सचे शिक्षण घेतो. काही महिन्यांपूर्वी त्याने एकलव्य स्टेडीयम येथे स्विमिंग शिकत असतांना त्याची सोनू नावाच्या मुलासोबत ओळख झाली, त्यानंतर दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्या मुलाची नेरु चौकात भेट झाली. यावेळी सोनू नावाच्या मुलाने त्या अल्पवयीन मुलाला हात देवून थांबविले. ते गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात बोलत असतांना तेथे त्याचे तीन अनोळखी मित्र आले. त्यांनी हम जो बोल रहे वैसा करो नहीं तो जान से मार देंगे अशी धमकी दिली. त्यानंतर ते तिघे मुलाला घेवून खान्देश कॉम्पलेक्स परिसरात घेवून गेले. याठिकाणी मुलाला अंगावरील कपडे काढून त्याच्यासोबत सेक्सचुअल हरेशमेंट करण्याच्या हेतूने त्याला अश्लील कृत्य करण्यास सांगत होते. यावेळी त्याचा व्हीडीओ देखील तयार करीत होते. हा व्हीडीओ व्हायरल करुन पोलिसांना तू चुकीचे मोबदल्यात त्या तरुणांनी मुलाकडे ३० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.