जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।
एप्रिल, मे महिन्यात उन्हाळ्याची दिवसेदिवस तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत पक्षांना दाणा पाणी भूकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून इनरव्हील क्लब जळगांव यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य असा उपक्रम राबवला तो म्हणजे तहानलेल्यांना पाणी पाजण्याचा.

यासाठी त्यांनी 5 मोठे रांजण ठेवून येणारा जाणाऱ्यांसाठी थंडगार पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी देखील त्यांनी सदस्या यांनी स्वीकारली असून संपूर्ण उन्हाळ्याच नाही तर कायम स्वरूपी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी इनरव्हील क्लब जळगावच्या प्रेसिडेंट डॉ रितू कोगटा, व्हाईस प्रेसिडेंट निशिता रंगलानी, गुंजन कांकरिया, मनिषा पाटील ,डॉ सुहासिनी महाजन, रेणुका हिंगु, स्वाती चौधरी, दीपा पवार, प्रतिभा सूर्यवंशी, रेखा पांगळे, सारीका दलाल,लीना पवार उपस्थित होते.




















