जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातून गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या अनेक घटना घडत असतांना आज मात्र जिल्ह्यातील तीन गावातून तीन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या आकडा गाठला आहे. याप्रकरणी त्या त्या पोलीस स्थानकात गुन्हे देखील नोंद करण्यात आल्या असून यातील पळवून नेल्या जाणाऱ्या मुलींचे वय १६ वर्षाच्या खाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील पालकांना एक मोठे आव्हान आहे कि आपल्या अल्पवयीन मुली व मुलांना संभाळणे गरजेचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने 29 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते 30 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आजोबांनी दिल्यावरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत जामनेर तालुक्यातील एका गावातून १५ वर्षे पाच महिन्याच्या अल्पवयीन मुलीला २ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जामनेर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.
तर तिसऱ्या घटनेत भुसावळ शहरातील लाल जैन मंदिराजवळून एका १६ वर्षीय मुलीला ३ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आजीने दिल्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.