जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२४
जगातील प्रमुख उद्योन्मुख देशांच्या अर्थव्यस्थांना एकत्र करीत आर्थिक, सुरक्षित आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणसाठी चीन येथे नुकतीच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जळगावची रहिवासी तथा अहमदाबाद येथील पंडित दीनदयाल एनर्जी विद्यापीठाची विद्यार्थीनी आश्लेषा राजेश यावलकर हिने सहभाग घेवून देशाचे नेतृत्व केले. भारतात सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात या विषयावर आश्लेषाने पेपरचे सादरीकरण केले.
ब्रिक्स म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि आता जानेवारी २०२४ पासून इथियोपिया, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असलेला एक अभ्यास गट आहे. यात जागतिक लोकसंख्या (४७ टक्के), जागतिक जीडीपी (३६ टक्के) आणि जागतिक व्यापारात (३५ टक्के) पेक्षा जास्त हिस्सा आहे. डरबन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या ब्रिक्स संशोधन संस्थेच्या सहकार्याने संस्कृती, कला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ब्रिक्स समिती आहे. दक्षिण आफ्रिका, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो, आणि कॅम्पिनास युनिव्हर्सिटी, ब्राझील, मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, आणि सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया, कोटा विद्यापीठ, पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी (भारत) चे सहकार्य लाभले. भारत आणि जिलिन युनिव्हर्सिटी तसेच फुदान युनिव्हर्सिटी, चीन शैक्षणिक, संशोधक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योगपती आणि धोरणकर्ते यांच्या फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद आयोजित करणे हा मुख्य उद्देश या मागील आहे.