जळगाव मिरर | २३ नोव्हेबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे ६ हजार मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर असून माजी मंत्री गुलाबराव देवकर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे मात्र येत्या काही तासात जळगाव ग्रामीणचे चित्र स्पष्ट होणार आहे.