जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावरील आठ महिन्या पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला नौदला मार्फत उभारणी करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला या घटनेने छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि या घटनेला जबाबदार असणाऱ्या इतर व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, उ बा ठा गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटिल, दिलीप पाटिल,विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटिल यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात स्वराज्य संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथिल राजकोट किल्ल्यावरील भारतीय नौदला मार्फत उभारणी करण्यात आलेला आणि आठ महिन्या पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेला 35 फूट उंच पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला
हि अत्यंत निंदनीय घटना आहे. हा प्रकार सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोर अवमान करणारा ठरतो शिवाय तो महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेवर परिणाम करणारा आणि प्रत्येक नागरिकांच्या मनाला ठेच पोहचवणारा आहे.
आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो म्हणजे या पुतळ्याच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आणि कोणत्याही तांत्रिक बाबी तपासुन न बघता घाईगडबडीत पुतळ्याचे अनावरण केल्याचे निदर्शनास येते संबंधित घटनेला फक्त अधिकारीच जबाबदार नसुन सरकार सुद्धा जबाबदार आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली असुन सर्व नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे यातून महाराष्ट्र राज्याच्या अपमान झाला असुन याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या घटनेतून अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अवमान आणि महाराष्ट्र राज्याची दुखवलेली अस्मिता याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजिनामा द्यावा तसेच या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार, अधिकारी, व इतर जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चून राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी सर्वांच्या मनाला ठेच पोहचवणारी आहे. या घटनेमुळे सर्वांचे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचा अवमान झाला असुन महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली आहे .पुतळ्याचे बांधकाम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या निकृष्ठ कामासंदर्भात तक्रार केली होती परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही ज्या किल्ल्यावर पुतळा उभारला आहे तो शिवकालीन किल्ला इतक्या वर्षानंतरही मजबूत आहे .मग आठ महिन्यांपूर्वी उभारणी करण्यात आलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? यातून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी कामातही भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येते तसेच तांत्रिक बाबी व पुतळा उभारणी साठी आवश्यक शासकीय बाबींची तपासणी न करता घाईगडबडीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पुतळा उभारणी कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या निंदनीय घटनेचा आम्ही तिव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या घटनेची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. असे रोहिणी खडसे म्हणाल्या यावेळी यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र माळी,लताताई सावकारे,भागवत पाटिल, प्रेमचंद बढे, अनिल पाटील,प्रविण पाटिल,बापु ससाणे, संजय कोळी, साहेबराव पाटिल,सोनु पाटिल,प्रविण दामोदरे, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे,योगेश काळे,राहुल पाटिल, निलेश भालेराव,भुषण पाटिल, रउफ खान, अज्जू खान,सय्यद फिरोज, जितेंद्र पाटिल,सुभाष खाटीक,रफिक मिस्त्री,हरिभाऊ कवळे,भैय्या पाटिल,बाळा चिंचोले अजय अढायके आणि पदाधिकारी उपस्थित होते