मेष – आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. बोलताना थोडा संयम ठेवा. वरिष्ठांशी बोलत असताना काळजीपूर्वक बोलणे योग्य ठरेल.
वृषभ – त्यांना उद्या अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण कराल. तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
मिथुन – व्यवसायाशी संबंधित काही मोठे काम होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.बोलताना संयम ठेवा. कोणत्याही वादात पडू नका. आज व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कर्क – नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे. वरिष्ठांकडून काही शुभवार्ता मिळतील. कनिष्ठ आणि वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. आज अतिरिक्त खर्च होईल. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी कराल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.
सिंह – कुटुंबाचे सहकार्य मिळेल. जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. सामाजिक जीवनात तुमची उत्सुकता वाढेल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले वाद संपुष्टात येतील. तुमची रखडलेली कामे एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीनं पूर्ण होतील.
कन्या – व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. छोट्या व्यावसायिकांनाही भरपूर नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे लोक त्यात काही बदल करतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाऊ शकेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.
तूळ – नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. कार्यालयात अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दबावामुळं तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. जोडीदार आणि कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल.
वृश्चिक – आर्थिक स्थिती मजबूत राहील. तरुणांना लव्ह लाईफबद्दल आनंद मिळेल. अनोळखी लोकांना व्यवसायात भागीदार बनवू नका. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे.
धनु – अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. जवळच्या व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल.
मकर – कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. पैसे कसे वाचवायचे ते शिकाल, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुमच्या मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
कामे काळजीपूर्वक करा. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळं काळजी वाटेल.
कुंभ – प्रत्येक कामात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज जोडीदारासोबत प्रवासाचा योग आहे. तुम्ही आज शॉपिंग करण्याची शक्यता आहे.
प्रेमात यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता.
मीन – तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्ही खूप दिवसांपासून घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करत आहात, ते पूर्ण होईल. नवीन वाहना खरेदीची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळं तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल.