मेष : आज तुम्ही तुमचे विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नातेसंबंध सुधारतील. तरुण आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतील. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर तुम्ही गुप्त योजनेला बळी पडू शकता. सकारात्मक राहण्यासाठी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. व्यवसायाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर होतील. चुकीच्या आहारामुळे पोट खराब होऊ शकते.
वृषभ : आज प्रयत्न केल्यास योग्य यश मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली राहिल. लाभदायक प्रवासाचे योगही बनतील आणि त्यातून योग्य संधीही मिळतील. घरातील वातावरण योग्य राखणे महत्त्वाचे आहे. पैसे उधार घेणे किंवा देणे टाळा. तुमच्या व्यवसायाशी संबंधित कामे गुप्त ठेवण्याची काळजी घ्या. व्यवसाय आणि वैयक्तिक कार्यात व्यस्त राहू शकता. पोटविकाराचा त्रास होवू शकतो.
मिथुन : आज तुम्ही घेतलेला कोणताही महत्त्वाचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी सर्वात मोठे भांडवल आहे. कुटुंबाच्या सुखसोयींमध्येही तुम्ही हातभार लावाल. गैरसमजामुळे नात्यात दुरावा निर्माण होवू शकतो. विनाकारण मनात निराशा राहील. मुलांना खूप सुखसोयी देण्याऐवजी मध्यम जीवन जगायला शिकवा. व्यवसायात तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्य चांगले राहू शकते.
कर्क : आज मनाप्रमाणे काम केल्याने आत्मविश्वास उंचावेल.एखाद्या प्रभावशालीक्तीशी झालेल्या भेटीमुळे तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. इतरांच्या व्यवहारात अडकू नका. चुकीचे काम केल्यास जास्त खर्च होऊ शकतो. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो.
सिंह : जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या संकटात मदत कराल. मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर गांभीर्याने विचार करा. चुकीच्या कामांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील. कामकाजात कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय राखला जाईल. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल.
कन्या : दैनंदिन दिनचर्येत काही बदल घडवून आणण्यासाठी ज्ञानवर्धक कार्यात वेळ व्यतित करा. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. दैनंदिन कामे सुरू होतील. अचानक चांगली बातमी मिळेल. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा अन्यथा तुमची बदनामी होवू शकते. तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल. ध्यान करा किंवा धार्मिक ठिकाणी काही वेळ व्यतित करा. व्यावसायिक दृष्टिकोनातून ग्रह अनुकूल राहील. जोडीदाराचा पाठिंबा राहिल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : आज दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. मेहनतीनुसार नफा मिळत राहिल. सामाजिक कार्यातही तुमचे महत्त्वाचे योगदान असेल. घरातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मुले स्वतःच्या काही समस्येमुळे तणावात राहतील. कुटुंबीयांच्या मदतीने लवकरच परिस्थिती निवळली जाईल. व्यस्ततेमुळे तुम्ही विषयावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. पती-पत्नी एकमेकांशी सुसंवाद साधून उत्तम कौटुंबिक व्यवस्था राखतात. तब्येत ठीक राहील.
वृश्चिक : आज दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित राहिल. ठराविक वेळेत काम पूर्ण होईल. दैवी शक्तीवर तुमचा दृढ विश्वास ठेवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. नवीन काही शिकण्याच्या इच्छेतही वेळ जाईल. संभाषण करताना नकारात्मक शब्द वापरू नका, त्यामुळे कामात अडथळा निर्माण होईल. पार-व्यवसायात काही लाभदायक सूचना मिळतील. पती-पत्नी व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देऊ शकणार नाहीत. असंतुलित आहारामुळे जळजळ आणि ॲसिडिटी सारख्या समस्या जाणवण्याची शक्यता.
धनु : घरात पाहुण्यांचे आगमन झाल्याने वेळ आनंदात जाईल. योग्य वर्तनामुळे तुमचे प्रतिमा संवर्धन होईल. घराच्या देखभालीच्या कामांशी संबंधित खर्च जास्त असेल. जवळच्या व्यक्तीशी गैरसमज झाल्याने मतभेद होऊ शकतात. व्यावसायिक कामांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. संसर्गासारख्या समस्या जाणवतील.
मकर : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्हाला नवीन यश मिळेल. तुमच्या बोलण्यातून समस्यांवर तोडगा निघेल. खास लोकांना भेटाल. कधी कधी अतिविचारात वेळ निघून जाईल. कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात. तुमच्या कामात जोडीदार तुम्हाला साथ देईल. आरोग्य उत्तम राहिल.
कुंभ : घरातील सदस्यांच्या सहकार्याने बहुतेक इच्छित कामे पूर्ण होतील. तुम्ही तणावमुक्त व्हाल. काही नकारात्मक परिस्थिती तुम्हाला त्रास देतील; परंतु तुम्ही तुमच्या क्षमतेद्वारे त्यावर उपाय शोधाल. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा कामात अडथळा येवू शकतो. कार्यक्षेत्रात अंतर्गत सुव्यवस्था व्यवस्थित राखली जाईल. पती-पत्नीमध्ये सामंजस्य नसल्यामुळे तणाव राहील.
मीन : घरातील मुलांसंदर्भात शुभ माहिती मिळाल्याने उत्साही वातावरण असेल. नवीन वस्तूंची खरेदीही शक्य होईल. मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित पार्टीचेही आयोजन केले जाईल. तुमच्या जवळचे काही लोक तुमच्या विरोधात काही योजना करू शकतात त्यामुळे सावध रहा. तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होईल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम करु शकतो.