जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी २व्हिडिओ ट्विट केले. यापैकी एका व्हिडिओत मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड कारमध्ये बसल्याचे दिसते. कार मुंडे चालवत असून, वाल्मीक कराड त्यांच्या शेजारी बसल्याचे दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओत धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तूल असल्याचा फोटो आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांच्या या कृतीवर संताप व्यक्तकरत म्हणाल्या, हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रिल्स दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे मी डाऊनलोड केले. ३५५४ गुंठे जमीन धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची जमीन एकत्र आहे, असे त्या म्हणाल्या.
वाल्मीक कराड यांना अटक काहोत नाही? मंत्री धनंजय मुंडे हे वाल्मीक कराड यांचे निकटवर्तीय असून त्यांना त्यामुळे अटक होत नाहीय. त्यामुळे २८ डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा निघत आहे, असे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी सांगितले.
पंकजा मुंडेकोल्हापुरातम्हणाल्या, याप्रकरणी सर्वातअगोदर मीगोपीनाथ गडावरूनएसआयटी स्थापन करण्याची मागणीकेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्याचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते याप्रकरणात जातीने लक्ष घालून न्यायभूमिका घेऊन त्या माझ्या लेकरालान्याय देतील.