• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२६

बोदवड परिसरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात गंभीर हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यासह तीन पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल तसेच पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. संवेदनशील वादाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे घडलेल्या खूनप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी ही कठोर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील फिर्यादी पक्षांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. या वादातून पुढे एक अदाखलपात्र गुन्हाही नोंदविण्यात आला होता. दोन्ही गटांतील वाढते वैमनस्य लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधक कारवाईची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य न ओळखता कोणतीही ठोस चौकशी अथवा प्रतिबंधक उपाययोजना न केल्याने दोन्ही बाजूंमधील तणाव वाढत गेला.

दरम्यान, १९ मे रोजी हिदायत नगर परिसरात दोन्ही गटांमध्ये पुन्हा वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचल हे अन्य कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गटांतील पूर्वीच्या वादाची पूर्ण माहिती असतानाही संबंधितांना ताब्यात घेणे किंवा कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी केवळ समज देऊन दोन्ही पक्षांना सोडून दिल्याचे समोर आले आहे.

याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून २१ मे रोजी दोन्ही गटांमधील वादाने हिंसक वळण घेत एकाचा निर्घृण खून झाला. विशेष म्हणजे, या गंभीर परिस्थितीची माहिती स्थानिक नगरसेवक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन तसेच व्हॉट्सअॅपद्वारे प्रभारी अधिकारी सपोनि दीपक सुरवडकर यांना दिली होती. मात्र, माहिती मिळूनही त्यांनी स्वतः कोणतीही कारवाई केली नाही किंवा अधीनस्थांना आवश्यक सूचना दिल्या नाहीत. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नियंत्रण कक्षालाही याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचे चौकशीत समोर आले. पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ कार्यालयाने अखेर दीपक सुरवडकर, रवींद्र गुरचल आणि नंदकिशोर धनके यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठी चर्चा रंगली आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group