जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
राज्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्या भोसलेला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. बीड पोलीस आणि प्रयागराज पोलीस यांच्या माध्यमातून त्याला ताब्यात घेतले आहे.
सतीश भोसलेने एका तरुणाला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. अखेर 6 दिवसांनंतर तो सापडला आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश भोसले विरोधात NDPS कायद्याच्या कलम २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्याच्या अटकपूर्व जामीन प्रक्रियेत नव्याने अडथळे निर्माण झाले आहेत. दरम्यान, शिरूर कासार पोलीस ठाण्यात भोसलेविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर बीड पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे.सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, आणि त्याच्यावर पोलिसांचे सतत लक्ष होते. अखेर प्रयागराज येथून त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल असून, त्यातील दोन शिरूर आणि चकलांबा पोलीस ठाण्यात तर तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केला आहे.त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाणार आहे.