जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच वीज मीटर फॉल्टी असल्याने सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याने वीज कंपनीतील लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे वीज मीटर फॉल्टी असल्याने त्या बदल्यात सकारात्मक अहवाल देण्यासाठी 20 हजाारांची मागणी करीत तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीतील सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे, लाईनमन संतोष सुकदेव इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी यांना पकडण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाडळसे, ता.यावल येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक श्री.योगेश ठाकूर, श्रीमती नेत्रा जाधव पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोना किशोर महाजन, पो कॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.