जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२४
शहरातील दुध फेडरेशन रोड परिसरातील नारायणी पार्क येथे प्रगती प्री प्रायमरी स्कूल येथे दि.१५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्कूलचे मुख्याध्यापक सौ.सुरेखा सोनार यांनी यावेळी मुलांना स्वतंत्र दिनाचे महत्व पटवून दिले. यावेळी लहान मुलांवर देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी देशभक्तीपर गीताचे देखील कार्यक्रम करून मुलांनी भारत माता कि जय अशा घोषणा देवून एकच जयघोष केला.
यावेळी प्रगती प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक सौ.सुरेखा सोनार, पूनमताई, प्रणिताताई, दिपालीताई, इंदूताई, वैशालीताई, प्रतिमाताई, सीमाताई यांनी देखील या कार्यक्रम साजरा केला.