अमळनेर : विक्की उत्तम जाधव
प्रताप कॉलेज(स्वायत्त) च्या करिअर कौंसेलिंग सेंटरचे एकूण २७ विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदासाठी निवड झाली आहे.सन २०२३ मध्ये झालेली ही निवड कौतुकास्पद स्वरूपाची आहे.खा.शि.मंडळ संस्थेच्या चिटणीस कार्यालयात उपस्थित १४ विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,जेष्ट संचालक हरी भिका वाणी,डॉ.संदेश गुजराथी,योगेश मुंदडे,सी ए नीरज अग्रवाल,संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन,सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,शिक्षक प्रतिनिधी व्ही.एम.कदम,उप प्राचार्य डॉ.जयंत पटवर्धन,डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही.बी.मांटे या सर्वांच्या हस्ते गौरव चिन्ह,प्रतापिय,बुके देऊन यथोचित सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
डॉ.अनिल शिंदे – यु.पी.एस.सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्यक्तिगत 1 लाख रुपये देणार : कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त परिश्रम करावे आणि आपली योग्यता सिद्ध करावी.जे विद्यार्थी यु.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रोख 1 लाख रुपये घोषित केले,अधिकाधिक विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेकडे वळले पाहिजे,असे मत व्यक्त केले.सन २०१४ मध्ये डॉ.एस.ओ. माळी व डॉ.धिरज वैष्णव यांनी सुद्धा आय.एस.एस होणा-यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी मुंबई पोलीस सुशिल धनगर यांनी सुद्धा करिअर कट्टा व सी.सी.एम.सी विभागाच्या ऊपयुक्तते बद्दल सांगितले.
विविध पदासाठी निवड झालेले विद्यार्थी:
मुंबई पोलीस : १.कुंभार जयवंत संजय २.कुंभार निलेश बुधा ३.हिरालाल शांताराम पाटील ४.अजय विश्वास पाटील ५.सुशिल समाधान धनगर ६.महेश संजय पाटील ७.हर्षल रविंद्र साळुंखे ८.भूषण राजेंद्र वाघ ९.नरेंद्र प्रकाश पवार १०.प्रशांत कुंभार ११.जयवंत कुंभार १२.लोकेश पाटील १३.सौरभ कोळी १४.श्याम पारधी १५.निकिता पाटील १६.हर्षल पाटील १७.विजय बापु धनगर
अकोला पोलीस : १.आनंद राजेंद्र पाटील
निवड : ग्रुप डी रेल्वे – १.शरद चैत्राम पाटील २.धनंजय पाटील ३.भूषण लिलाधार पाटील ४.प्रवीण देविदास पाटील ५.उमेश भिका पवार ६.रजत बडगुजर
निवड- बी.एम.सी.फायरमन – १.अजय बाळू नेतकर २.मनिष अमृत संदानशिव ३.शरद बाळू पाटील
प्रस्तुत निवडी बद्दल सी.सी.एम.सी विभागाचे सर्व सन्मानीय सदस्य,शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.प्रस्तुत छोटेखानी समारंभाचे सूत्र संचालन सी.सी.एम.सी विभागाचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलिप शिरसाठ,मेहुल ठाकरे,कैलास पाटील,दिपक मोरे,महेश मोरे आदींनी सहकार्य केले.
