जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४
शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला सैराट स्टाईल पळवून संसार थाटणाऱ्या मांडळ येथील तरुणाला मारवड पोलिसांनी सिताफिने अटक केली. मुलीच्या जबाबावरून मुलाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून संशयित तरुणाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी बसने शिक्षणासाठी अमळनेर येथे ये-जा करीत होती. अशा तिची ओळख मांडळ येथील दिपू पाटील या तरुणाशी झाली. त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ती मुलगी दिपूसोबत वडीलांच्या मोबाईलवरुन बोलू लागली. हा प्रकार मुलीच्या भावाला समल्यानंतर त्याने मुलीला रागवले. त्याचा राग आल्याने दि. १३ जून रोजी सकाळी ९ वाजता फोन करून सांगितले की, माझा भाऊ मला रागवतो मला येथून घेवूनच चल असे सांगितले. त्यानुसार मुलाने मुलीला पळवून नेण्याचा प्लॅन तयार केला. दुपारच्या सुमारास मुलगी शिकवणीच्या फी साठी ३ हजार रुपये घेवून घरातून बाहेर पडली. त्यानंतर चोपडा येथे गेले आणि भाऊ बहिण असल्याचे सांगत सोबत राहू लागले.
शेतकऱ्याने दिलेल्या खोली हे प्रेमी युगुल राहू लागले आणि शेतात काम करुन आपला उदनिर्वाह करीत होते. यावेळी दोघांमध्ये शारिरीक संबंध देखील झाले होते. तर दुसरीकडे पोलिसांकडून अल्पवयीन मुलीचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी तांत्रिकपद्धतीने तपास करीत दोघांचा शोध घेतल्यानंतर ते दोघे कोल्हापूर येथे असल्याचे समजले. त्यानुसार सहाययक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड.कॉ सुनील तेली यांनी सैराट प्रेमी युगुलाला शिरोली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. प्रेमीयुगुलला ताब्यात घेऊन मारवड पोलिस ठाण्यात आणले. मुलीने दिलेल्या जबाबवरून दिपू पाटील याच्याविरुत्र पोस्कोतंर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला महिला बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.