जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
केसीई सोसायटी संचालित ओजस्विनी कला महाविद्यालयातील प्रा.पुरुषोत्तम विष्णू घाटोळ यांना नाशिक येथील ७९ व्या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनातील स्पर्धेत बेस्ट पोट्रेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त प्रा.घाटोळ यांचा गुणगौरव केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील डॉ. सुनंदाताई गोसावी आर्ट गॅलरी गोखले एज्युकेशन सोसायटीे येथे नाशिक कला निकेतनचे सचिव प्रा.दिनकर जानमाळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा.घाटोळ यांच्या ” ऋषी” या जलरंगातील व्यक्तिचित्रणाला प्रोफेशनल कॅटेगिरीमध्ये बेस्ट पोट्रेट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप सिल्वर मेडल, प्रमाणपत्र आणि आठ हजार रुपयांचा धनादेश असे आहे. प्रा. घाटोळ यांच्या जळगाव येथील गुणगौरव प्रसंगी प्राचार्य मिलन भामरे यांच्यासह प्रा. पियुष बडगुजर, डिगंबर शिरसाळे, सुजय उबाळे आदी उपस्थित होते