अमळनेर : विक्की उत्तम जाधव
धुळे येथील मानवता बहुउद्देशीय संस्था आयोजीत काव्य संमेलन, 2023 काव्य पुरस्काराने प्राध्यापक .प्राकश पाटील भवरखेडेकर यांना काव्य क्षेत्रतिल मनाचा समजला जाणारा पुरस्कार यांच्या काळजाच्या तळाशी, या विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदनेवर आधारित. काव्यास काव्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.त्यांच्या या काव्य कवितेने महाराष्ट्रातील विनाअनुदानित, सी.एच.बी.धारक.पायाभुत पद व शासनाचे धोरण यावर प्रकाश टाकलेला आहे.संपूर्ण महाराष्ट्रात आज जे योगदान शिक्षकांच आहे ते शब्दात सांगता येत नाही. समाज शिक्षकांना समजून घेत नाही ही शोकांतिका त्यांच्या काव्यात माडली आहे.

एका दिव्यांग शिक्षक विद्यार्थी घडवून त्यांना समाज आणि राष्ट्र निर्मिती च सामर्थ्या शिक्षणातून देत आहे, ही गोष्ट गौरवास्पद आहे. कवी कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रा. प्रकाश पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. यशपंढरी इंग्रजी क्लास चे शिक्षक प्रा. प्रकाश पाटील हे आपल्या दिव्यांगावर मात करत कोणाचीही मदत न घेता अमलनेरात यशपंढरी इंग्रजी क्लास चलावतात अतिशय हालाकीच्या परिस्थिति तुन संघर्ष करणारे प्रा. प्रकाश पाटील यांना काव्य पुरस्कार मिळाल्याने परिसरात आंनद व्याक्त होत आहे.
यावेळी श्री.पवन लोहार, हरेश्वर साळुंखे, प्रा.पराग पाटील,डॉ. एस.आर.चौधरी सर, प्राध्यापिका मंदाकिनी भामरे, प्रा.जे.बी.पाटील, प्रा.धिरज वैष्णव. यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले प्रा. प्रकाश पाटील यानी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यानेच हे शक्य झाले. आपल्या सर्वाचा आभारी आहे. काव्य पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली असून अधिक काम करण्याची प्रेरणा मला मिळेल व भविष्यात देखील नवनवीन उपक्रम करण्यासाठी प्रोत्साहन राहणार.




















