जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२५
दिनांक 16 एप्रिल रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे रस्ता रोको आकाशवाणी चौकात करण्यात आले सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅरल 65.41 डॉलर आले आहेत यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किमती प्रति बॅरल 63.40 डॉलर होती या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे.रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 15 ते 16 आणि डिझेलवर प्रति लिटर 6.12 रुपये नफा कमवत आहेत असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढवून जनतेचे पैसे लुटत आहेत.
आंदोलनावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या
“कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त – हेच का अच्छे दिन?”
“पेट्रोलवर नफा, जनतेवर फटका – सरकारची धोरणं भटका!”
“नफा कंपन्यांना, महागाई जनतेला – हेच का ‘सबका साथ’?”
“पेट्रोल डिझेलच्या दरात घोटाळा – केंद्र सरकारचा असंवेदनशील तमाशा!”
.“नफा भरघोस, पण दरवाढ रोज – हे कुठलं धोरण?”
केंद्र सरकार हाय हाय अशा विविध घोषणा देण्यात आल्य . सदर आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदर आंदोलनात प्रमुख उपस्थिती मा.रा.कॉं.पा.महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , सुनील माळी , ओबीसी सेल जिल्हाअघ्यक्ष अशोक पाटील , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण , मा नगरसेवक राजू मोरे , जिल्हाउपंअघ्यक्ष किरण राजपूत , ओबीसी सेल महानगर अघ्यक्ष नामदेव वाघ , डॉक्टर सेल महानगर अघ्यक्ष डॉ राहुल उदासी , सरचिटणीस रहिम तडवी , युवक महानगर उपंअघ्यक्ष आकाश हिवाळे , चेतन पवार , साहिल पटेल , रफीक पटेल , योगेश साळी , संजय चव्हाण , मयूर पाटील , आबिद खान,अरबाज पटेल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.