जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
येथील के.सी.ई. सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविदयालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींसाठी गठीत करण्यात आलेल्या युवती सभेचे दि.२०/०८/२४ रोजी नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नूतन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. त्याप्रसंगी त्या विद्यार्थिनींशी हितगुज साधत होत्या. उद्घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी “स्त्री – काल, आज आणि उदयाची” या विषयावर युवतींना मार्गदर्शन केले.
सदर उद्घाटनप्रसंगी त्यांनी स्वतःला वेळ दया.स्वयं सिद्ध व्हा. स्वतःला सुरक्षित करा. यश-अपयशाला धैर्याने सामोरे जा. चांगल्या व्यक्तीरेखा असलेली पुस्तके वाचा. स्वतःचे स्वतःच मूल्यमापन करा. तुमचे निखळ सौंदर्य हे तुमच्या विचारांमध्येच दडलेले असते असा मौलिक सल्ला दिला. विद्यार्थीनींची संघर्षाकडे बघण्याची वृत्ती व दृष्टीकोन कसा असायला हवा याबद्दल प्रोजेक्टरच्या साह्याने विविध स्लाइड्सच्या माध्यमातून यथोचित मार्गदर्शन केले.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविदयालयाच्या विज्ञान शाखा समन्वयिका प्रा. स्वाती बऱ्हाटे होत्या. तसेच पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.बी. ठाकरे, वाणिज्य व कला शाखा समन्वयक प्रा.श्री. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक युवती सभा अध्यक्ष प्रा.रुपम निळे यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया चौधरी आणि आभार प्रदर्शन प्रा. धनश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवतीसभेच्या सर्व सदस्या शिक्षिकांनी सहकार्य केले.