राज्यातील सर्वात मोठे शहर म्हणून मुंबई मानली जाते. त्यामुळे साहजिकच प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी लोकलने प्रवास करावा लागत असतो. लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात. प्रचंड गर्दी असल्याने धक्का बुक्की देखील होत असते.
अनेकदा धावत्या लोकलमध्ये धक्काबुक्की झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की,उभी असलेली महिला सीटवर बसलेल्या मुलीसोबत बाचाबाची करताना दिसून येत आहे. या दोघांमध्ये नेमकं काय धडलं,हा वाद कशावरुन झाला हे कळू शकलेलं नाही. मात्र त्या महिलेचा राग पाहुन प्रकरण गंभीर असल्याचं दिसून येत आहे.
Slap War.
The Lady's intervention & the timely Motorman's Horn seems to have finally ended the fight.
Life inside #MumbaiLocal Ladies Coach.#Lifeline of Mumbai pic.twitter.com/g9VOuFPwc3
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 24, 2023
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, उभी असलेली महिला त्या मुलीसोबत वाद घालत असताना तिला कानाखाली वाजवते. महिलेच्या वयाचा मान ठेवत ती मुलगी खाली बसते. मात्र त्या महिलेचा राग काही कमी होत नाही. ती महिला मुलीला बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसून येत आहे. महिलेने मर्यादा ओलांडल्यानंतर ती मुलगी देखील तिला प्रत्युत्तर देऊ लागली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Slap War 2
Frustrations at the end of a tiring day seems to be "settled" by a Slap inside #MumbaiLocal trains..
Or is it the fight for the fourth seat.
And that threating attitude of the lady….saying "nikal ke phenk dengi" & dare come in between..
Struggles inside Ladies… pic.twitter.com/uXeVGC40Fk
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 25, 2023
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यात पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेली महिला पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असलेल्या महिलेला मारहाण करताना दिसून येत आहे. बाचाबाची झाल्यानंतर पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली महिला पिवळ्या ड्रेसमध्ये असलेल्या महिलेला कानाखाली मारते त्यानंतर दोघेही एकमेकांचे केस ओढू लागतात.