जळगाव मिरर / १९ जानेवारी २०२३
एका अभिनेत्रीनं राखी सावंत विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर आज आंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला ताब्यात घेऊन सहा तासाच्या चौकशी केल्यानंतर सोडून दिलं आहे. सहा तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी राखीला सोडून दिले आहे. राखी सावंत यांनी आज पोलिसांची चौकशीमध्ये सहकार्य केलं असल्याचं पोलिस सूत्रांकडून समजलं आहे. शिवाय राखी सावंतनं चौकशीसाठी तिचा मोबाईल सुद्धा पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांनी आज ६ तास तपास केल्यानंतर राखी सावंतला सोडून दिलं. राखी सावंत आंबोली पोलीस स्टेशनमधून हात जोडून बाहेर निघाली.
आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं होतं. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप होता. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. मुंबईच्या सत्र न्यायालयाने राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेतलं होतं.