जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२४
अयोध्येतील राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळा अवघ्या जगाने आपल्या डोळ्यांनी बघितला. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होताच देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या भव्य दिव्य सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) एक व्हिडीओ पोस्ट केला. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !आज कारसेवकों की आत्मा प्रफुल्लित है और 32 साल बाद शरयू नदी प्रसन्न व हर्षित है।
जय श्रीराम!Sharayu smiles after 32 years as the souls of Karsevaks rejoice!
Jai ShreeRam! pic.twitter.com/w9Yz7eBEdW— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
गेल्या अनेक दशकांपासून अयोध्येत राम मंदिराची बांधण्यात यावं, अशी रामभक्तांची होती. ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते .हा ऐतिहासिक सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कोट्यवधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता.
मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत भावूक झाले होते. दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या. आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचं वाटप केलं जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार २४ जानेवारी २०२४ पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुलं होणार आहे.