अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेरचे वैभव असलेले संत सखाराम महाराज सस्थान रथ उत्सव आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळख आलेल्या अमळनेर नगरीतील संत सखाराम महाराज वाड़ी संस्थानचा रथोत्सव आज दि. १ मे रोजी मोहिनी एकादशीला पार पडणार आहे. रथोत्सवाची यंदा जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वाडी संस्थान मधून सायंकाळी 6 वाजता रथोत्सवास सुरुवात होईल. वाड़ी चौक सराफ बाजार दगड़ी दरवाजा फर्शी पुल पैलाड मांग वाड़ा कसाली मार्गे रथ रात्रभर गावात फिरून सकाळी सात वाजे पर्यंत रथ आपल्या स्थानी येणार. रथामध्ये श्री भगवान् लालजींची मूर्ती ठेवली जात असते. रथाच्या मागे प.पू. प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत असतात. रथोत्सव पाहण्यासाठी अमळनेर आणि जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रतून भाविक भक्ताची ची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते संपूर्ण खानदेशातून शहरात गर्दी होत असते. शुभारंभ प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित राहत असतात. प्रत्येक समाज आणि मित्र मंडळ या रथोत्सवाची जबाबदारी सांभाळत असतात. रथोत्सवाचा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात येत असते. सुतार समाजाचे मोगरी बनवन्यासाठी मोलाचे योगदान असते. यावेळी प्रत्येक समाजाचे ही सहकार्य असते. रथ उत्सवा नंतर तीन दिवसानी म्हणजेच ५ तारखेला पालखी मिरवनुक असून एक महीना यात्रा उत्सव असतो.