जळगाव मिरर / ५ मार्च २०२३
गेल्या ३९ दिवसापासून सिनेमागृहात धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा आताही जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. भारतात 532.08 कोटींची कमाई करत हा सिनेमा ‘नंबर 1’ ठरला आहे. जगभरात या सिनेमाने 1,028 कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘वेड’, ‘वाळवी’, ‘सेल्फी’ हे सिनेमे सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. मराठी सिने-रसिक ‘वेड’ आणि ‘वाळवी’ पाहायला सिनेमागृहात जात आहेत. पण त्यासोबत ते ‘पठाण’ सिनेमादेखील पाहत आहेत. तसेच ‘सेल्फी’ सिनेमा पाहण्यापेक्षा सिनेरसिकांनी ‘पठाण’ सिनेमाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा बोलबाला आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे शाहरुखने या सिनेमाचं प्रमोशन केलं नाही.
सिनेमा पाहण्यासाठी त्याने चाहत्यांना जबरदस्ती केली आहे. सिनेमाबद्दल तो एकही शब्द बोलला नाही पण तरीही त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर निबंधाच्या निबंध लिहित आहेत. शाहरुखचा सिनेमा किती यशस्वी आहे आणि किती नाही हा भाग बाजूला राहिला. पण त्याच्यावर टीका होत असतानाही त्याने सिनेमाच्या तिकीटांची किंमत हजारो रुपये ठेवण्याची हिंमत दाखवली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असलं तरीत्याचा खरेपणा आणि आत्मविश्वास चाहत्यांना पुन्हा एकदा भावला आहे.
