
जळगाव मिरर | १६ मार्च २०२५
राज्यासह जिल्ह्यातील देखील गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता यावल तालुक्यातील एका गावातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. जीवेठार मारण्यासह चाकूचा धाक दाखवून पाच महिन्यांपासून सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. तिच्या सासऱ्यांकडूनतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी रोजी या पाच महिन्याच्या काळात वारंवार अत्याचार केला जात होता. दरम्यान, विवाहिता माहेरी गेली असता तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर हे करीत आहे.