अमळनेर : विक्की उत्तम जाधव
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना आज सुप्रीम कोर्टाने सुरत येथील निर्णयाविरुद्ध स्थगिती दिल्याने अंमळनेर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौक अंमळनेर येथे फटाक्याची आतिषबाजी व साखर वाटून आनंद व्यक्त केला.
सदर प्रसंगी शेतकी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष काँग्रेसचे नेते अनिल शिंदे, मुन्ना शर्मा, माजी नगरसेवक धनगर अण्णा पाटील, माजी सभापती पंचायत समिती सुरेश किरण पाटील, अध्यक्ष जिल्हा शेतकी काँग्रेस भागवत गुरुजी, अध्यक्ष राष्ट्रसेवा दल अमळनेर संदीप घोरपडे सर, प्राध्यापक श्याम पवार सर, प्राध्यापक भागवत सूर्यवंशी, मुस्लिम समाजाचे नेते हाजी डबीर पठाण, राजीव भाट, नीलकंठ तात्या, स्वप्निल बोरसे, प्रफुल बोरसे, हर्षल जाधव आदी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादचे घोषणांनी महाराणा प्रताप चौक दणकवून दिले