जळगाव मिरर | २५ जून २०२३
गेल्या काही दिवसापासून पावसाळा सुरु झालेला जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र आता शेतकरीला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. असा जोरदार पाऊस सुरु राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरुन जाणार आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मागील अर्धा पसापासून मुंबई उपनगरातील दहिसर भागात सुरू झालेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळील सुहासिनी पावसकर सबवे परिसरात कमरे इतके पाणी साचले आहे यामुळे या भागातून जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आला होता.