जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अंध बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी दृष्टी फाउंडेशन नेहमीच पुढाकार घेत असते या फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पन्नास अंध बांधवांना धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीसाठी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत यावेळी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंध बांधवांसाठी नेहमीच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे दृष्टी फाउंडेशन यंदा जिल्ह्यातील पन्नास अंदमानवांना दिनांक 28 रोजी दोन दिवसीय धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या सहलीमध्ये नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर व मोहटादेवी या ठिकाणी अंध बांधवांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहे या सहलीसाठी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे यांनी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर गोहिल, प्रकाश पंडागळे, मंगेश शेवाळे यांना १० हजार रुपयाची मदत करून सहकार्य केल्याने अंध बांधवातर्फे माजी उपमहापौर डॉ.सोनवणे यांचे कौतुक करण्यात आले आहे.