जळगाव मिरर । २६ जानेवारी २०२३ ।
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी येथे प्रजासत्ताक दिवस साजरा करून हात से हात जोडो अभियानास सुरुवात करण्यात आली.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी अडावदचे शाहीर यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावरील पोवाडा म्हणून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षयांनी स्वतंत्र्याचे महत्त्व पटवून दिले यावेळी सेवा दल अध्यक्ष संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमाला सरचिटणीस जमील शेख ,ज्ञानेश्वर कोळी ,देविदास ठाकरे, युवक मुजीब पटेल, मनोज चौधरी शिवाजीराव शिंपी ,विजय दर्जी ,चंद्रकांत पाटील ,सखाराम मोरे ,उद्धव वाणी, आशुतोष पवार ,विष्णू घोडेसवार ,गजानन भोळे, गवळी आण्णा, तुळशीराम सोनवणे ,जितेंद्र चांगरे, आनंद गोयर, मीराताई सोनवणे,माया सुरवाडे, आमीना तडवी, सुमनताई मराठे व इतर कार्यकर्ते हजर होते.