
जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२३
शेअर मार्केटमध्ये दामदुप्पट मिळवून देण्याचे आमिष दाखवून मामाकडून ७० लाख रुपये उकळले. त्यानंतर पुण्याच्या एका मित्रासह गर्लफ्रेंडला घेऊन गोवा गाठले. तेथे चार दिवस मौजमजा केली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी तपास करून दोन मित्रांना गोव्यातच बेड्या ठोकल्या. दोघेही गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील सय्यद तल्लहा सय्यद जमाल (वय १९) व यश रवींद्र गायकवाड (२०, रा. कडवा, जि. पुणे), अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. बीडमधील व्यापारी शेख इसाक शेख महेमूद (रा. आसेफनगर) यांचा तल्लहा सय्यद हा नातेवाईक आहे. त्यानेच शेख यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. शेख यांनी त्याच्यावर विश्वास ठेवन जलै २०२२ मध्ये ऑनलाइन १५ लाख रुपये टाकले. त्यानंतर इतरांकडून उसनवारी करून ५५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, त्यांची फसवणक झाली