जळगाव मिरर / ३ फेब्रुवारी २०२३
शहरातील एका परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी पाच दरोडेखोरांनी घरात घुसत सदस्यांना चाकूसह लाकडाच्या दांडक्याच्या धाक दाखवित दुचाकीसह 50 हजार रुपयांची रोकड व दहा ग्रॅम सोन्याची चैन घेवून फरार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने जळगाव शहरात भितीचे वातावरण तापले होते.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील गुड्डू राजा नगर परिसरातील रहिवासी प्रमोद घाडगे हे पत्नी व मुलासह रहायला आहेत. ते आणि त्यांचा मुलगा कुरिअरचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच दरोडेखोर प्रमोद घाडगे यांच्या घरात घुसले. चाकू कुऱ्हाड तसेच लाकडं त्यांच्या हातात होती, त्यापैकी खालच्या खोलीत झोपलेल्या प्रमोद घाडगे व त्यांच्या पत्नी या दोघांना दररोखोराने पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. तसेच घरात कोण कोण आहे हे सुद्धा विचारले. घाडगे यांनी मुलगा वरच्या खोलीत झोपला आहे असे सांगितल्यावर तीन दरोडेखोर वरच्या खोलीत गेले व मुलाची कॉलर पकडून त्याला सुद्धा खाली घेऊन आले.
तिघांना खाली बसून दरोडेखोर पुन्हा वरती गेले कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांनी पन्नास हजाराची रोकड तसेच प्रमोद घाडगे यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन घेतली. त्यानंतर दरोडेखोरांनी घाडगे यांच्या दुचाकीची चावी घेतली तसेच बाहेर अंगणात हातातील लाकडं फेकून घाडगे यांची सोबत घेत त्या दुचाकीवरून पोबारा गेला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकूरवाड तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान या धाडसी दरोड्याच्या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.