जळगाव मिरर | १९ जुलै २०२३
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला रुग्णालयात असलेल्या बहुतांश आरोग्य सेवा काही तांत्रिक कारणाने ,रिक्त कर्मचारी संख्ये अभावी तसेच गेले तिन वर्षांपासून सुरू असलेल्या बांधकाम मुळे बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी रुग्णांचे नातेवाईक रोहिणी खडसे यांच्या कडे करत असतात. आज रोहिणी खडसे यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून तेथील सोय सुविधांची पाहणी केली व अधिक्षक डॉ योगेश राणे यांचेकडून माहिती घेतली
यावेळी अत्यंत हालाखीचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळाले. रुग्णालयात विविध प्रकारच्या बांधकामाची कामे बऱ्याच दिवसांपासून सुरू असून ती अपूर्णवस्थेत पडून आहेत त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले त्यावेळेस सध्याची असणारी रुग्णालयाची प्रशस्त अशी इमारत उभी राहू शकली, त्याच वेळेस स्टाफ क्वार्टर्सचे बांधकाम झाले. रुग्णालयाचा दर्जा वाढवल्यामुळे नर्सेस, वैदकीय अधिकारी व इतर स्टाफ वाढवून मिळाला रुग्णालयातत महिला प्रसूती गृह, शस्त्रक्रिया गृह,एक्स-रे सुविधा अशा अनेक सोयीसुविधांचा लाभ नागरिकांना मिळायला लागला .मात्र अलीकडील काळात याअगोदर सुरु असलेल्या गाठीच्या, हर्निया च्या व इतर सर्व शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत, तांत्रिक अड़चनीमूळे रुग्णालयात असणारे प्रसूती गृह बंद असुन महिलांना त्यासाठी जळगांव येथे जावं लागत आहे.रुग्णालयात एक्स-रे ची सुविधा असुन सुद्धा तंत्रज्ञ एकच असल्यामुळे तो रजेवर गेल्यास लोकांना सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे.
औषधांचा तुटवडा आहे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकाआहे पण त्याला एकच ड्रायव्हर असल्यामुळे तो नसला की गंभीर आजारी असणारे रुग्ण सुद्धा येथून घेऊन जाणे अवघड होत आहे, प्रसंगी काही लोकांचा उपचार मिळण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णांची तब्बेत खालावलयाच्या5घटना घडल्या आहेत क्लार्क च्या 4 जागा मंजूर असताना सुद्धा फक्त 1 क्लार्क उपलब्ध आहे. रुग्णालायत मागील काळात प्रसाधन गृहाचे काम झाले परंतु लाजिरवाणी बाब म्हणजे तेथे ना पाण्याची सोय आहे! ना नळ आहे! ना टाकी! इतकी विचित्र अवस्था रुग्णालयात झालेली आहे.
कोरोनाच्या काळात जवळ-जवळ अडीच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला परंतु आज त्याची दुरवस्था झालेली आहे. नूतनीकरण करताना केलेली बांधकामे अपूर्णावस्थेत असून त्याला दरवाजे खिडक्या बसविणे बाकी आहे अशी दयनीय अवस्था रुग्णालयाची झालेली आहे. अशा असंख्य अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आले याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रुग्णांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील याचा प्रयत्न करावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी प्रशासनाकडे केली
तसेच कर्मचारी संख्या वाढवून मिळण्यासाठी आ एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक मस्तान कुरेशी, प्रविण पाटील,बापू ससाणे, प्रशांत भालशंकर, संजय कोळी,रउफ खान, राहुल पाटील,हाशम शहा, राम शिमरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते