जळगाव मिरर | ६ जानेवारी २०२५
मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक (SIT) स्थापले असून, SIT मध्ये तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. त्यात एपीआय महेश विघ्ने, हवलदार मनोज वाघ आणि एक उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. SIT च्या तपासामध्ये व्हायरल झालेल्या एक फोटोमुळे विवाद निर्माण झाला, ज्यात एपीआय महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो समोर आला. वाल्मिक कराड या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचे आरोप होते, आणि त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्येच्या तपासात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहेत, त्यात दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी पुण्यातून अटक करण्यात आली. वाल्मिक कराडवर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असण्याचा आरोप आहे. 31 डिसेंबर रोजी तो पुण्यात सीआयडीकडे शरण आला होता. आणि त्यानंतर एक फोटो व्हायरल झाल्यानंतर, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले, तसेच निष्पक्ष तपास होणार नाही, असा आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर SIT मधून एपीआय महेश विघ्ने, हवलदार मनोज वाघ आणि उपनिरीक्षकाला हटवण्यात आले आहे. सध्या बीडची स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे, आणि आतापर्यंत त्यांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अजून एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचा दावा आहे की, तो आज रात्रीपर्यंत पकडला जाईल.