जळगाव मिरर | ८ मार्च २०२४
देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच मार्च महिन्यात सोने-चांदीने जोरदार चढाई केली असून सोन्याने आतपर्यंत 2,720 रुपयांचा लांब पल्ला गाठला तर चांदीने पण मजल दर मजल मोठा टप्पा गाठला. सोने आणि चांदीच्या या तुफान फटकेबाजीने ग्राहक भांबवले. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी आघाडी उघडल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली. भाव अजून वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोने 70,000 रुपयांच्या घरात पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अमेरिकन धोरण, जागतिक घडामोडींचा परिणाम यामुळे हे सर्व घडत आहे.
गेल्या सात दिवसांत सोन्याने मोठी उसळी घेतली. या सात दिवसांतील किंमतींवर नजर फिरवल्यास हे सहज लक्षात येते. या महिन्यात 1 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत सोन्याने 2720 रुपयांची चढाई केली. 1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मार्च महिन्यात चांदीने जोरदार उसळी घेतली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,500 रुपये आहे.