जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई व जळगाव भारत स्काऊट गाईड शिक्षण विभाग जि. प. प्राथमिक व माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर,स्काऊट गाईड भवन जळगाव येथे स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर ०५ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे.
या शिबिराला जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व कुवर जिल्हा आयुक्त गाईड तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सौ.किरण जिल्हा सचिव सौ.सरलाताई पाटील, श्री. डी.एस. सोनावणे, जिल्हा सहसचिव, तसेच संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रेरणेने शिबिराला ५० शिबिरार्थी उपस्थित आहेत. जिल्ह्यातून एकूण ५० शिक्षक स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करीत आहेत. या शिबिराला माग॔दश॔न करणारे ,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊटस्) बी व्हीं. पवार, जिल्हा स्काऊट संघटक श्री संजय बेलोरकर सर व जिल्हा गाईड संघटक हेमा वानखेडे मॅडम शिबीर प्रमुख श्री. आर. ए.कोळी, शिबीर उपप्रमुख गिरीष भावसार ,किशोर पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, यांचे माग॔दश॔न बहुमोल आहे.
स्काऊट मास्टर यांना स्काऊट व गाईड संबंधित अभ्यास, स्काऊट गाईड झेंडा वंदन,वैयक्तिक व सामुहिक स्वच्छता,शिस्त,स्वालबंन,राज्य पुरस्कार प्राविण्य पदके अॅम्ब्युलन्स मॅन प्रावीण्य पदक,विविध वेबसाईट हाताळणे योगासने,व्यायाम प्रकार,होकायंत्र हाताळणे,संदेश पध्दती ,नकाशा वाचन, स्टार गेसिंग,प्रथमोपचार,विविध प्रकारचे बॅडेज,स्टेचर्स रोग्याला इजा झाली तर प्राथमिक उपचारासाठी कसें करावे याचे प्रात्यक्षिक,गाठीचे विविध प्रकार ,प्रकल्प..निसर्गाच्या सान्निध्यात बिन भा ड्यांचा चा स्वयंपाक कसा करावा याचे प्रात्यक्षिक व विविध प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात येत असून त्यांचा प्रत्यक्ष कृतियुक्त सराव प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे.