• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : पत्नी दुसरा विवाह करीत असल्याने एकाने पेटवून घेतले !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 7, 2025
in क्राईम
0
खळबळजनक : पत्नी दुसरा विवाह करीत असल्याने एकाने पेटवून घेतले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ मार्च २०२५

गेल्या काही महिन्यापासून प्रेम प्रकरण व लग्नाच्या माध्यमातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता इचलकरंजी येथे पत्नी दुसरा विवाह करीत असल्याचे समजल्याने शेखर अर्जुन गायकवाड (वय 31, रा. करंबळ, ता. अकलूज, जि. सोलापूर) याने शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पेटलेल्या अवस्थेत गायकवाड हा पोलिस ठाण्याच्या आवारात धावू लागल्याने पोलिसांची त्याला वाचवताना चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यात गायकवाड गंभीर जखमी झाला असून कोल्हापुरातील सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गायकवाड याला वाचवताना पोलिस नाईक नीलेश कोळी यांच्या हाताला झळ बसली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गायकवाड हा चालक म्हणून कामास आहे. तो घटस्फोटित आहे. चाकण येथे काम करत असताना इचलकरंजीतील एका घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली. त्यातून त्यांनी 6 महिन्यांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. मात्र त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी इचलकरंजीतच काही दिवसांपासून राहात आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये नोटरी पद्धतीने सोडचिठ्ठी झाल्याचेही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पत्नीचा नातेवाईकांकडून दुसरा विवाह आज करून दिला जात असल्याची माहिती मिळाल्याने शेखर गायकवाड इचलकरंजीत आला. त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांसमोर कैफियत मांडली. पोलिसांनी पत्नीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. दरम्यान ठाण्याच्या आवारात शेखर याने अचानक पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले. त्याचा आरडाओरडा ऐकून काहींनी स्वत:चे कपडे काढून तर काहींनी चादर घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.

पेटत्या अवस्थेत गायकवाड पोलिस ठाण्यात शिरल्याने त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांची पाचावर धारण बसली. पोलिसांचीही धावपळ उडाली. आयजीएममध्ये सासू, सासरे, पत्नी आल्याशिवाय उपचार घेणार नाही, असा आरडाओरडा तो करीत होता. उपचार करताना रुग्णालय कर्मचार्‍यांचीही तारेवरची कसरत झाली. यापूर्वीही गायकवाड याने नातेवाईकांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर पुणे परिसरात पत्नीला मारहाणीसह अन्य गुन्हे दाखल आहेत.

Tags: Solapur

Related Posts

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !
क्राईम

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

November 26, 2026
शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत
क्राईम

शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

November 26, 2026
कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

कजगावमध्ये गोळीबाराचा थरार : तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

मध्यरात्री काळाचा घाला : अज्ञात वाहनाच्या धडकेत ४१ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू !

November 26, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अंत्यविधीसाठी गेले कुटुंब अन् चोरट्यांनी साधली संधी : घराचे कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास!

November 26, 2026
जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?
क्राईम

जामिनावर बाहेर येताच कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार: हत्या प्रकरणातील आरोपीचा निर्घृण खून?

November 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

November 26, 2026
संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

November 26, 2026
शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

November 26, 2026
मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

November 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group