जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही महिन्यापासून विनयभंग व अत्याचाराच्या घटना वाढत असतांना आता पुणे शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यवतमाळहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर मासिक पाळी सुरू असतानाही कॅबचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्यांदा अत्याचार करताना व्हिडिओ तयार करून त्याने ब्लॅकमेल करत तिच्यावर दोनदा एका मॉलच्या पार्किंगमध्ये नेत कारमध्ये बलात्कार केला. याप्रकरणी त्याच्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सलमान (पूर्ण नाव माहीत नाही) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रविवारी एका २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार, धमकावणे तसेच अॅट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणी ही यवतमाळची असून पुण्यात नामांकित कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण घेते. सध्या ती पेइंंग गेस्ट म्हणून राहते. २ जून रोजी तरुणीने निगडी येथे जाण्यासाठी कॅब बुक केली होती. पैसे देण्यासाठी नंबर घेतल्यानंतर त्याच नंबरच्या आधारे त्याने तिच्याशी ओळख वाढवून तो तिला जबरदस्तीने कोंढवा येथील एका खोलीवर घेऊन गेला. मासिक पाळी सुरू असतानादेखील तिच्यावर बलात्कार करून अनैसर्गिक कृत्य केले. या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला.
सलमान याने पीडितेला पुन्हा एका दुसऱ्या मॉलच्या पार्किंगमध्ये नेत कारमध्ये तिच्यावर अत्याचार केले. आरोपीचा त्रास सहन होत नसल्याने तिने पेइंग गेस्टच्या मालकांना व मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तरुणीने धाडस करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली.