
जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२४
सात वर्षीय चिमुकलीचे तोंड दाबून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत विनयभंग केला. ही घटना दि. ८ रोजी एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी संशयित राहुल गोरेलाल नार्वे (रा. बडीया भगवान पुरा, खरगौर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील राहूल गोरेलाल नार्वे हा संशयित कामानिमित्त एमआयडीसी परिसरात स्थायिक झाला आहे. दि. ८ रोजी सायंकाळच्या सुमारास परराज्यातील सात वर्षीय चिमुकलीला जबरदस्तीने ओढून नेले. तसेच तिचे तोंड दाबून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. त्यानंतर संशयित हा तेथून पळून गेला. चिमुकलीच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित राहूल गोरेलाल नार्वे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. तपास सफौ विजय पाटील हे करीत आहे.