जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
वरणगाव फॅक्टरीतील वसाहत मध्ये ४८ वर्षीय खून झाल्याची घटना बुधवारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली आहे आयुध निर्माणी वसाहत मध्ये क्वार्टर नं ४४ टाईप श्री मध्ये प्रदीप जयसिंग इंगळे हे फॅक्टरीत सुपरवायझर पदावर नोकरीवर राहत होते. नेहमी प्रमाणे ते ड्युटीवर गेले होते दुपारी ते जेवणासाठी घरी आले असता त्यांचा लाकडी बॅटने व इतर वस्तुने मारून खून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पोलिसांना कळताच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी पीएसआय गांगुर्डे साहेब , पीएसआय सुशील सोनवणे पोहे का संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी , महेश चौधरी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी सुरक्षा विभाग कर्मचारी व व्यवस्था अधिकारी यांनी सुद्धा भेटी दिल्या असून फॉरेन्सिक लॅब तर्फे तपासणी करण्यात आली.
सदर घटना कोणत्या कारणाने घडली अद्याप समजु शकले नसून संशयित म्हणून तीन व्यक्तींना पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेण्यात आले आहे. मयत प्रदीप इंगळे यांच्या पत्नीचे न्यायालयात वाद असून पत्नीला खावटी सुरू आहे त्याला एक मुलगा आहे पण त्याच्या सोबत राहत नाही ते एकटेच घरात राहत असून मुक्ताईनगर येथील रहिवाशी आहेत तसेच त्यांची उचंदा येथे शेती पण आहे शेतीचेही वाद सुरू होते असे समजते. भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदर घटना स्टेट बँक परिसरात घडल्याने व हा प्रतिबंधीत एरिया असल्याने नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केली होती. मयत प्रदीप यांच्या डोक्यावर व छातीवर वार केल्याचे समजते. वरणगाव पोलसात उशीरा पर्यंत गुन्हा नोदण्याचे काम सुरू होते.