जळगाव मिरर / १६ मार्च २०२३ ।
नशिराबाद गावातील स्मशानभूमीजवळ पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गुरांच्या कत्तलखान्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते राज कोळी तसेच गोप्रेमींच्या माध्यमातून नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरीफ खान तसलीम खान (२२, रा. नशिराबाद) यास अटक केली आहे. कारवाईत घटनास्थळावरून गुरांचे मांस, हाडे, शिंगे तसेच कातडीससह गुरांच्या कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.