जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
जळगाव शहरातील शनिपेठ मित्र मंडळाचे यंदा ४८ वे वर्ष असून मंडळाने राजस्थानातील सावरिया सेठ भगवानचा देखावा साकारला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोशाख आकर्षक असून त्याचे अनावरण बुधवारी करण्यात आले.
जळगाव शहरातील शनिपेठ मित्र मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असून यंदा ४८ वे वर्ष आहे. मंडळाने यावर्षी राजस्थान चितोडगढ मंडफिआ येथील सांवरीया सेठ दरबारचा देखावा साकारला आहे. भव्य मंदिर आणि आकर्षक रोषणाईने संपूर्ण चौबे शाळा पटांगण सजले आहे. आजवर मंडळाने सजीव देखाव्यांसह अनेक आरास साकारल्या असून त्याला अनेक पारितोषिक देखील मिळाले आहे.
रक्तदान शिबीर, पोशाख अनावरण
शनिपेठ मित्र मंडळातर्फे आज बाजार समिती सभापती शाम सोनवणे यांच्या हस्ते मंडळाच्या पोशाखाचे अनावरण करण्यात आले आहे. तसेच उद्या दि.१२ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ दरम्यान दात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करण्यासाठी यावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अशी आहे कार्यकारीणी
मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष प्रकाश सत्यनारायण तिवारी, उपाध्यक्ष रवींद्र संजय महाजन, अविनाश विजय पाटील, सचिव भूषण इच्छाराम जाधव, सहसचिव गौरांक प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष अमोल मोहन सोनवणे, सहकार्याध्यक्ष सरगम प्रकाश जोशी, खजिनदार प्रसाद प्रकाश महाले, सहखजिनदार रुपेश गणेश चौधरी, मिरवणूक प्रमुख मनोज प्रकाश माळी, योगेश सुधाकर सपकाळे, लेझीम प्रमुख मनोज राधेश्याम जोशी, भावेश अरुण न्हावकर, सजावट प्रमुख संदीप अमृत पाटील, आकाश विलास न्हावकर, प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र सुभाष शिंदे, हर्षल अनिल चौधरी, रोषणाई समिती गोविंदा रमेश कुंभार, गोपाल दिलीप सोमाणी, रितेश संजय कुंभार, आकाश किशोर जोशी, उत्सव समिती युवराज भागवत सोनवणे, अक्षय चत्रभुज सोनवणे, आनंद संतोष जोशी, राकेश खिवराज लखारा, दीपक धोंडू कुंभार, निलेश संजय भामरे, रवी नथ्थू जाधव, परेश रमेश चौधरी, कपिल अशोक बडगुजर, राहुल शंकर जोशी, सोशल मिडीया टीम विक्रम नाना गायकवाड, मोहित सुनील शर्मा, अमोल दिलीप कुंभार, दशरथ लोटन कुंभार, चेतन कैलास गायकवाड अशी कार्यकारिणी आहे. तसेच सल्लागार समितीमध्ये माजी नगरसेवक मुकुंदा भागवत सोनवणे, प्रशांत मधुकर पाटील, माजी उपमहापौर अनिल अमृत वाणी, डॉ.जयंत भालचंद्र जहागीरदार, देविदास रमेश जगताप, जगदीश भास्कर नेवे, प्रशांत माधवराव खुटे, हरीष प्रल्हाद बडगुजर, कैलास उखा पंडित, संजय झावरू सूर्यवंशी, हेमंत संजय महाजन, निलेश मनोहर जोशी, बाबूलाल रामनिवास तिवारी, प्रभाकर नारायण महाले, भगवान नंदकिशोर जोशी, भरत आत्माराम शंखपाळ, अंबादास गुरव यांचा समावेश आहे.